सामाजिक कार्यकर्ते नारायण कांबळे यांच्या पाठ पूरावाला यश..
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – नारायण कांबळे
इचलकरंजी : येथील दि. डेक्कन को. आॅप. स्पिनिंग मिल्स एम्प्लॉईज को. आॅप क्रिडीट सोसायटीच्या रास्त भाव दुकानाची 100 टक्के अनामत रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी मा.दत्तात्रय कवितके साहेब यांनी जप्त करण्याचे आदेश दिला. याबाबत तक्रारदार ग्राहक मंजुनाथ जाडर याने जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे रास्तभाव दुकानाकडुन दरमहा मिळणाऱ्या धान्यात कपात करून दिली जात असल्याची तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी कार्यालय कडुन चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तक्रारी नुसार इचलकरंजी शहर पुरवठा कार्यालयाने रास्त भाव दुकानदार यांचा लेखी जबाब घेतला यामधे दुकानदार यांनी तक्रारदार यांचे वडील मयत असताना सुद्धा धान्य उचल केले असल्याचे सांगितले.
नंतर जिल्हा अधिकारी यांनी अर्ज निकाली काढण्यात आले असले चा आदेश दिला.
यावर तक्रारदार यांनी सामाजिक कार्यकर्ते नारायण कांबळे यांना सांगितले नंतर नारायण कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फेर तक्रार केली व तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी यांच्याकडे सबळ पुरावे सादर केले आणि शासनाची दुकानदार व पुरवठा कार्यालयाने कशी दिशाभूल केली याची माहिती दिली यासर्व माहितीची व तक्रारदार यांचे पुराव्यानिशी जिल्हा पुरवठा अधिकारी मा. दत्तात्रय कवितके साहेब यांनी डेक्कन रास्त भाव दुकानची 100 टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले.
अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नारायण कांबळे यांनी पत्रकार यांना दिली त्याच बरोबर शहरातील ज्या ग्राहकांची रास्त भाव दुकानदार बाबत कोणतीही तक्रार असल्यास कळवा असे आवाहन केले आहे.