नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन रंगतरंग उत्साहात

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – अकील शहा

साक्री : निजामपूर – शासकीय अनुदान नसताना देखील श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूलमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण बालकांना दिले जाते. विनाअनुदानित शाळा चालविणे ग्रामीण भागात मोठे आव्हान आहे. मात्र शिक्षणाचे पवित्र कार्य दातृत्वदायींच्या आर्थिक मदतीची कामगिरी उल्लेखनीय आहे. आज जगाला शैक्षणिक गुणवत्तेची गरज आहे शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन संसदरत्न नंदुरबार लोकसभा खासदार हिना गावित यांनी केले.
निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबन वाणी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन रंगतरंग उत्साहात झाले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजक कार्यक्रमांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली साक्री तालुक्यातील कलाप्रेमींसाठी विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराची पर्वणी आकर्षणाचा विषय ठरली.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुप अग्रवाल धुळे महानगर प्रमुख हे होते. प्रमुख अतिथी सुप्रिया गावित अध्यक्ष जि. प. नंदुरबार, हर्षवर्धन दहिते सभापती कृषी व पशुसंवर्धन जि. प. धुळे, चंदूबापू सोनार माजी महापौर धुळे, जयश्री पवार नगराध्यक्ष साक्री नगरपरिषद, धीरज अहिरे सदस्य जि.प. धुळे, विजय ठाकरे सदस्य ,जि. प. धुळे, डॉ नितीन सूर्यवंशी सदस्य जि. प. धुळे, सतीश वाणी सदस्य प.स.साक्री, माधुरी सोनवणे सदस्य प.स.साक्री, मनोज सोनवणे, सरपंच भामेर ग्रुपग्रामपंचायत, दीपक वाणी सरपंच प्रतिनिधी निजामपूर ग्रामपालिका, निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, उपाध्यक्ष दुल्लभ जाधव, सचिव सुमंतकुमार शाह खजिनदार भिकनलाल जयस्वाल, विश्वस्त मोहन सूर्यवंशी, वासुदेव बदामे, योगिता शाह, ललित आरुजा, अजितचंद्र शाह, सलीम पठाण, मुख्याध्यापक डॉ मनोज भागवत ललित सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात नरेंद्र तोरणे यांनी ऑनलाईन उपस्थिती तृप्ती शाह श्रीमती भानुबेन वाणी ट्रस्ट मुंबई यांनी तीन लाख रुपये, हेमंत शाह (CA) पुणे यांनी स्व. चंपकलाल शाह यांच्या स्मरणार्थ दोन लाख रुपये,नरेंद्र तोरणे यांनी ऑनलाईन उपस्थिती देऊन म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टला वडील स्व. माणिकराव पुंडलिक तोरवणे यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपये देणगी दिली यांनी ऑनलाईन कार्यक्रमात उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात संगीताच्या तालावर साकारलेली नृत्यविष्कार विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांसह प्रकटन करणारी पर्वणी ठरली. सामूहिक नृत्य प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या लघुनाटीका संगीताच्या तालावर होते, वेशभूषा आदी कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह यांनी केले प्रमुख अतिथींचा परिचय विश्वस्त वासुदेव बदामे यांनी करून दिला. सूत्रसंचालन निहारिका नांद्रे, पियुशा पवार या विद्यार्थिनींनी केले तर आभार डॉ. मनोज भागवत यांनी मानलेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन वाघ, प्रथमेश सोनवणे, प्रशांत साळवे, प्रेरणा पाटील, अश्विनी आहेर, प्रीती भावसार, प्रफुल्ल साळुंखे, निखिल तोरवणे, किशन वर्मा, सुरेश शिरसाठ, पुनम शिंदे, स्वाती कोठावदे, संगीता मोहने, राकेश ठाकरे, विनोद जाधव, मुस्तफा पटवे, हर्षदा राणे, ऋषिकेश नांद्रे, श्रीमती आशुमतीबेन शाह विद्यालयाच्या मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, म्हसाई माता महिला पतसंस्था कर्मचारी, म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्ट कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:47 am, January 15, 2025
temperature icon 30°C
टूटे हुए बादल
Humidity 32 %
Wind 23 Km/h
Wind Gust: 27 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!