DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी : रायप्पा मंडले
लातूर : वाडी कासार सिरसी येथे आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नुतन ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व नवनिर्वाचित सदस्याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वाडी कासार सिरसीचे सरपंच संगमाबाई बाबू मंडले, उपसरपंच राहुल पंडित ईश्वरे, माजी सरपंच बलभीम भोसले, सदस्य हणमंत भोसले , प्रतिष्ठित नागरिक रायप्पा मंडले, बालाजी मंडले, नामदेव मंडले, संजीव ईश्वरे, दयानंद भोसले, जालिंदर भोसले, राहुल भोसले आदी उपस्थित होते.