DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी: महेंद्रसिंग गिरासे नरडाणा :- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर ओव्हरटेक च्या नादात एस.टी.बसने समोरील ट्रकला धडक दिल्याची घटना घडली असून यात चार जण जखमी झाले आहेत. याबाबत बस प्रवासीने पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि १६ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास एम एच २० बि एल ११९० क्रमांकाची बस धुळे येथून शिरपूर कडे जात असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील बाभळे फाट्याजवळ असलेल्या अन्नपूर्णा हॉटेल समोर समोरील आरजे १४ जिके ०२९० क्रमांकाच्या मालट्रकला ओव्हरटेक करत असतांना समोरील ट्रकला जोरदार धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांसह नरडाणा पोलीसांनी धाव घेत जखमी प्रवासींना बाहेर काढत नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यात बस चालक रवींद्र भरत ठेलारी यांच्यासह वाहक आशा पाटील यांच्यासह दोन ते तीन प्रवासी जखमी झाले.याबाबत बस प्रवासी अमोल अहमद खान मुसाखान मन्यार रा.शिरपूर यांनी नरडाणा पोलीस स्टेशनात तक्रार दिली आहे.