DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी : अकिल शहा
साक्री: हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री १२:०० ते १२:३० दरम्यान कारण नसताना अनधिकृत प्रवेश करून कामगारांना कामापासून रोखून लोखंडी राँडने पंपावरील तीन युनिटवर जोराजोरात मारून डिस्प्ले व सहा नोझलचे तोडफोड करून नुकसान केले याप्रकरणी पेट्रोल पंप चालक विरेंद्र नटवरलाल जैन(रा. विघ्ननगर,दहीवेल ता.साक्री) यांनी साक्री पोलीस ठाण्यात कमलेश खंडू कुवर(रा.डुक्करझिरे ता. साक्री) यांच्यासह चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पीएसआय निकम करीत आहेत.