DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा: राष्ट्र पुरुषांचा पुतळा शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही बसू नये विनापरवानगी पुतळा बसविल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदखेडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील भाबड यांनी सांगितले आगामी काळात साजरी होणारे एकलव्य जयंती महाशिवरात्री व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पोलीस निरीक्षक भाबड म्हणाले की शासनाने घालून दिलेले निर्बंध सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. डीजेच्या वापराला परवानगी नाही मिरवणुकीत इतरांना त्रास होईल असे कृत्य कोणीही करू नयेत याबाबत उत्सव समितीच्या सदस्यांनी काळजी घ्यावी लागेल यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बोराडे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.