DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी : श्रीकृष्ण पाटील (वडणे)
धुळे:-धुळे तालुक्यातील बोरीस येथील माजी सैनिक मुकेश वंजी देवरे यांनी मेहनत आणि कष्ट घेत साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा २०२० वर्ष अंतर्गत लोकसेवा आयोगाव्दारे परीक्षा दिली, आणि त्यात यश मिळाल्याने आज अखेर आरटीओ म्हणुन शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी मुकेश देवरे(मुळ प्रवर्ग ओबीसी इएक्स सेर) गुणवत्ता यादी क्र.२२३ यांना बीओसी-इएक्स सेर-०५ प्रनर्गातुन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक(गट-क)म्हणुन प्रादेशिक परीवहन कार्यालय नंदुरबार. येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथे शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली आहे.
बोरीस गावचे शेतकरी वर्गातील वंजी भिवसन देवरे यांचा मोठा मुलगा ही इंडियन आर्मी मध्ये जुनिअर कमिशन ऑफिसर आहेत.देश सेवा करीत आहेत.त्यातच वंजी भिवसन देवरे यांचा लहान मुलगा मुकेश देवरे आहे.या कुटुंबांकडे सध्या ५० एकर जमिन असुन,मुळ शेती व्यवसाय आहे.
मुकेशे देवरे यांनी बोरीस परीसरात नवा आदर्श ठेवला असल्याने,इतरांनाही हेवा वाटेल अशी कामगीरी शिक्षण क्षेञातुन केली आहे.मुकेश देवरे यांचे शिक्षण बीए.एमबीए.बीएससी.अँग्रिकलटर डिप्लोमा इंन मेकॅनिकल, डिप्लोमा इन टेली कम्युनिकेशन ,अद्यावत एलएलबी शिक्षण सुरु आहे.यापुर्वी देश सेवेत आर्मी विभागात त्यांनी विविध भागात १८ वर्ष देश सेवा करुन सेवा निवृत्त झालेत.आणि मुकेश देवरे यांनी गगन भरारी घेत माजी सैनिक ते आरटीओ इन्स्पेक्टर झालाय.
यावेळी मुकेश देवरे यांनी चर्चात्मक माहीती देतांना म्हणाले की,माझ्या वडलांचे स्वप्न होते की माझा मुलगाने इन्स्पेक्टर आरटीओ ची टोपी घालावी,राज्यात सेवा करावी. हीच अपेक्षा होती.वडलांचे स्वप्न मी साकार केलंय आणि मला खुप आनंद आहे.खरं तर माझे बालपन खुपच गरीबीतुन गेलय.लहानपणातील ते दिवस आज ही आठवता.खुप हालाकिचे दिवस काढली आहे.आम्ही सामाजिक सेवा करत,मला तालुक्यातील समस्त माजी सैनिक-सैनिक परीवार तथा मिञ परीवाराची सहवास चांगला लाभला व अनेकांनी मला शुभेच्छा ही दिल्या आहेत.मला शिक्षणाची आवड खुपच आहे.शिक्षला वाघिणीचे दुध म्हणतात.शिक्षण कधीही वाया जात नाही.म्हणुन मला यश प्राप्त झाले आहे.असे ही आरटीओ मुकेश देवरे प्रस्तुत प्रतिनिधी श्रीकृष्ण पाटील यांच्याशी चर्चा करतांना म्हणाले.