DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️. प्रतिनिधी: प्रकाश चव्हाण
सोलापूर शहरातील शहर वाहतूक पोलीसा तर्फे चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी टोईंग वाहना द्वारे कारवाई केली जाते. मात्र टोईंग वाहनामुळे नागरिकांचा मोठ्या समस्यांना समोर जावा लागत आहे.
सोलापूर शहर वाहतूक शाखेतर्फे होणाऱ्या कारवाईबाबत जनतेतून एक चर्चा सुरू झाली आहे, त्यात टोईंग करणाऱ्या वाहनांनी खालील नियमांचे पालन करावे अशी सर्व सामान्यातून चर्चा होत आहे.
वाहन टोइंग करत असताना वापरायचे काही नियम याचे कार्यालयीन आदेश खालीलप्रमाणे आहेत.
ट्राफिक पोलिसांनी वाहन टोइंग करत असताना वापरायचे नियम व कार्यालयीन आदेश याविषयी माहिती.
1) टोईंग वाहनावर नेमण्यात येणारा अंमलदार पोलीस हवलदार वाहतूक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अंमलदार नेमण्यात यावा.
2) टोईंग वाहनावरील अंमलदार हा टोइंग वाहनाचा प्रभारी असल्याने त्याच्या नियंत्रणाखालील टोईंग वाहनावरील चालक व कामगार काम करतील.
3) टोईंग व्हॅन वरील अमलदार कर्तव्य करीत असताना वाहनावरील कारवाई करण्यापूर्वी मेगाफोन द्वारे उद्घोषणा करून, त्यानंतर वाहन उचलून वाहन टोइंग व्हॅन वर ठेवतील.
4) टोईंग द्वारे कारवाई करत असताना वाहनचालक उपस्थित राहिल्यास त्याच ठिकाणी अंमलदार हा कायदेशीर कारवाई करून सशुल्क दंडाची पावती जागेवर देईल, वाहन उचलून घेऊन जाणार नाही व वाहन टोईंगचे चार्जेस घेणार नाही.
5) टोईंग व्हॅन वरील अंमलदारांनी वाहनावर केलेले कारवाई संबंधाने वाहन उचललेल्या ठिकाणी खडूने विभागाचे नाव लिहावे.
6) टोईंग व्हॅन वरील अंमलदार टोईंग वाहनांना घातलेल्या अटी व शर्ती यांची जाणीव करून देतील व त्याप्रमाणे चालक कामगार राहत असल्याची खात्री करतील.
7) टोईंग व्हॅन वरील अंमलदार तसेच चालक व त्यावरील कामगार जनतेशी सौजन्याने वागतील कोणतेही उद्धट वर्तन करणार नाहीत.
8) टोईंग व्हॅन वरील अंमलदार हा कोणत्याही परिस्थितीत कारवाई करताना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. कोणत्याही व्यक्तीचा फोन आला तरी कारवाई केल्याशिवाय वाहन सोडणार नाही.
9) टोईंग वाहनावरील अंमलदार अथवा प्रभारी अधिकारी यांनी टोईंग वाहनावरील चालक, कर्मचारी व कामगार यांच्याकडून अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ या कार्यालयास अहवाल सादर करतील.
10) टोईंग वाहनावरील कर्मचारी हा 18 वर्षावरील असावा तसेच स्वच्छ निळ्या गणवेशात नीटनेटका असावा, केस दाढी वाढलेली नसावी रात्रीच्या वेळेस स्वयंप्रकाशित गणवेश वापरती.
11) टोईंग वाहनावरील कर्मचारी हे कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारे मध्यस्थाची भूमिका करणार नाही किंवा स्वतःहून निर्णय घेणार नाही.
12) टोईंग वाहनावर हंडीकॅम असावा तसेच हंडीकॅम बॅकअप दहा दिवसाचा असावा सदर वाहनावरील कॅमेरे द्वारे करण्यात आलेले चित्रीकरण वाहन मालकांनी संग्रहित करून दर महिन्याला संबंधित प्रभारी अधिकारी यांच्याकडे अभिलेखावर ठेवतील.
कोणीच जाब विचारत नाही, म्हणून दिवसाढवळ्या संपूर्ण शहरात नाहक आणि विनाकारण दिवसभर अशाप्रकारे गाड्या उचलून हप्ते वसूल करणे हे एकप्रकारे छळवणूक व नागरिकांची पिळवणूक आहे.