DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : नारायण कांबळे
कोल्हापूर : महाराष्ट्रात लाच स्वीकारण्याच्या बातम्या दररोज वृत्तपत्रातून झळकत असतात. असाच एक किस्सा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगर परिषदेत घडला.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगर परिषदेत तक्रारदार यांची बांधकाम परवाना फाईल तपासून पुढे सरकवण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अभिजीत हराळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 75 हजार रुपयाची मागणी केली होती व कनिष्ठ अभियंता संकेत हंगरेकर व लिपिक सचिन सावंत यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयाची मागणी केली होती. ही मागणी केलेली रक्कम लिपिक सावंत यांनी खाजगी इसम अमित संकपाळ यांच्या हस्ते देण्याचे सांगितले ती रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने संकपाळ यांना रंगेहात पकडले.
या कारवाईचा सापळा पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोसई. संजीव बंबरगेकर, पोहेकॉ. विकास माने, पोकॉ. मयूर देसाई, पोकॉ. रुपेश माने, चापोहेकॉ. विष्णू गुरव यांनी सापळा यशस्वी करून कारवाई पार पाडली.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.