DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️. प्रतिनिधी :- अकिल शहा
साक्री : साक्री शहरासह परिसरात पुन्हा एकदा चो-यांचे प्रमाण वाढू लागले आहे ,पोलिसांसमोर चोरांनी पुन्हा आवाहन उभे केले आहे.
साक्री शहरातील स्वामी कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत रोकडसह सोन्याचे दागिने व एक मोटर सायकल असा एकूण 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे, याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ग्रामसेवक हर्षल रमाकांत सोनवणे (वय ३७) रा.आदर्श कॉलनी, पिंपळनेर यांनी साक्री पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २४ ते २५ रोजी त्यांचे काका राजेंद्र सोनवणे रा.स्वामी कॉलनी,साक्री हे बाहेर गावी गेले होते ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कंपाउंड व मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेला चाळीस हजार रुपये किमतीचा व ४ तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार, वीस हजार रुपयांची रोकड व घराबाहेर पार्किंग केलेली १५,००० रुपये किमतीची मोटरसायकल(MH18-BT-2257) असा एकूण 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भांदवि कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.