DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️. प्रतिनिधी : – महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा -झालेल्या गारपीटग्रस्त भागात येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे क्रीडा व उच्च शिक्षण मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील खोरी , टीटाने ,भागात काल गारपीटी सह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यात कांदा, हरभरा, केली, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे,
या नुकसानग्रस्त भागाची आज जिल्ह्याची पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी साक्री तालुक्यात भेट दिली यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला ठिकाणी टिटाणे ,खोरी, पेटले ,हट्टी ,इंचाळे, दुसाने इत्यादी गावांना पाहणी केली यावेळी डॉक्टर सुभाष भामरे, खासदार हिना गावित माजी मंत्री आमदार जयकुमार रावल , आमदार मंजुळा गावित जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते
Byte – गिरीश महाजन – धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री