DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे – महाराष्ट्र राज्य शासकिय-निमशासकिय कर्मचारी समन्वय समितीच्या सुकाणु समितीत आमचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचारी संघटना सहभागी असुन सुकाणु समिती व आमच्या राज्यस्तरीय सर्व संवर्गीय संघटनांनी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात सन २००५ नंतर कार्यरत कर्मचा-यांना १९८२ नुसार जुनी पेन्शन योजना लागु करणे व बक्षी समिती खंड -२ अहवालातील वेतन त्रुटी बाबत दुर्लक्ष केलेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांवर झालेला अन्याय या दोन प्रमुख मागण्या व अन्य प्रलंबीत मागण्यासाठी जि.प.प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती, जि.प.कर्मचारी युनियन, जि.प.लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, पशुसंवर्धन कर्मचारी संघटना, अभियंता संघटना, वाहन चालक संघटना, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटनांसह इतर सर्व संवर्गीय कर्मचारी संघटना दिनांक १४ मार्च २०२३ पासुन बेमुदत संपात सक्रीय सहभागी होणार असल्याबाबतचे निवेदन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चंद्रकांत पवार यांना देण्यात आले, यावेळी जि.प.कर्मचारी समन्वय समितीचे श्री.राजेंद्र नांद्रे, दिनेश महाले, वनराज पाटील, किशोर पगारे, डी.एम.पाटील, राहूल पवार, जयदिप पाटील, डी.ए.पाटील, सचिन गुंडलेकर, नरहर पाटील, धिरज परदेशी आदि उपस्थित होते.