DPT NEWS NETWORK 🗞️✍️
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.
जातीवादी संघटनांना आवरा – रणजीत राजे भोसले
धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज शहर जिल्हाअध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड साहेब व पोलीस उपअधीक्षक श्री.ऋषिकेश रेड्डी साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले.
गेल्या काही दिवसांपासून जातीयवादी संघटना व जातीयवादी पक्ष हे धुळे शहरांमध्ये अराजकतेचे वातावरण तयार करीत आहेत. विविध जाती,धर्मांमध्ये कशा पद्धतीने जातीय तेढ निर्माण होईल, याचाही प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडिया व विविध जुन्या व्हिडिओंद्वारे धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.धर्मवादी व कट्टरपंथीय लोक समाजामध्ये विष पसरण्याचे काम करीत आहे. यासंदर्भामध्ये धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड साहेब यांची भेट घेतली व त्यांनी जातीयवादी संघटना व जातीवादी पक्ष यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच काही समाजकंटक हे शहरातील वातावरण खराब करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली. सोशल मीडियाद्वारे जे लोक विषारी प्रचार व अफवा पसरवीत आहेत त्यांच्यावरील कडक कारवाई करण्याची मागणी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
धुळे शहरांमध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने रहात आहेत. वेळेवरच समाजकंटकांवर कारवाई केल्यास धुळे शहरातील जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. भविष्यात होणाऱ्या विविध निवडणुका, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा आदी निवडणुकीच्या पूर्वी शहरांमध्ये घातपाताची शक्यता आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी यावेळेस राष्ट्रवादी मार्फत करण्यात आली.
तसेच धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकोड साहेब यांनी शिवजयंती शिवरात्री आधी समोरच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखली तसेच धुळे शहरांमध्ये अतिशय सुंदर प्रकारे मॅरेथॉन स्पर्धेचा आयोजन केले याबद्दल धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावेळी रणजीत राजे भोसले, जोसेफ मलबारी, गोरख शर्मा, भिका नेरकर, यशवंत डोमाळे, भानुदास लोहार, रईस शेख, किरण बागुल, महेंद्र शिरसाठ, राजेंद्र चौधरी, उमेश महाजन, चेतन पाटील, दीपक देवरे, मनोज कोळेकर, रामेश्वर साबळे, जुनेद शेख, दानिश पिंजारी, दिलीप पाटील, जितू पाटील, मयूर देवरे, भटू पाटील, फिरोज खान पठाण, नाझीर शेख, गोरख कोळी, भुषण पाटील, सरोज कदम, तरुणा पाटील, शकीला बक्ष, जयश्री घेटे, स्वामिनी पारखे, विशाल केदार, तस्वर बेग, शेख समद, सोनू घारू, योगेश अहिरे, गोलू नागमल आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.