DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी :- मनोहर गोरगल्ले
पुणे : सोशल मीडियावर प्रसिध्दी मिळविण्याच्या नादात आत्ताचे तरुण काय करतील याचा भरवसा नाही . दत्ता भारती हा 34 वर्षीय युवक मूळ गाव बीड सध्या वराळे येथील 2 मित्रांसोबत करांजविहिरे भामा आसखेड धरणावर पार्टी करण्यासाठी आला. दारूचा अंमल चढल्यावर रील करण्यासाठी मोबाईल घेऊन पाण्याच्या बाजूला गेला. पाय घसरून पाण्यात पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याच्यासोबत असणाऱ्या तिघांनाही पोहता येत नव्हते उरलेल्या दोघांनी आरडाओरडा केला पण तो युवक पाण्यात बुडाला. ही माहिती महाळूनगे पोलीस स्टेशनचे पी एस आय दिनेश चव्हाण यांना कळली. त्यांच्याकडे पॉइंट पोलीस चौकीचा चार्ज आहे. त्यांनी आपले अंमलदार पाठवले व खेड तालुका आपत्ती निवारण टीम आपदा मित्रांशी व तळेगाव येथील आपदा मित्रांशी संपर्क साधला. त्यांनी सर्वांनी मिळून सकाळी 10 वाजता बॉडी बाहेर काढली. सहभागी आपदा मित्र वन्यजीव रक्षक मावळ संस्था व आपदा मित्र संस्थापक निलेश गराडे,
अध्यक्ष अनिल आंद्रे,भास्कर माळी, गणेश गायकवाड, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, जिगर सोलंकी,
सत्यम सावंत, सचिन वाडेकर, श्रीयश भेगडे, अनिश गराडे, सार्थक घुले, गणेश सोंडेकर, कमल परदेशी, बापूसाहेब सोनवणे, शांताराम गाडे, श्रीकांत बिरदवडे, सचिन भोपे, नितीन गाडे, सचिन मरगज, विक्रांत चौधरी घटनास्थळी पोहचले व त्यांनी सर्व परिस्तिथी हाताळली व मयत दत्ताची बॉडी बाहेर काढली.