DPT NEWS NETWORK ✍️📝
प्रतिनिधी – आरिफ भाई शेख
पुणे : आळंदी देवाची नगरपरिषद येथे नेहमीप्रमाणे विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का जाणवला अर्थात हा सुखद धक्का होता. आळंदी पोलीस वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक शहाजी पवार हे त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत आळंदी नगरपरिषद येथे दाखल झाले. कार्यालयीन अधीक्षक तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी गिरमे यांना त्यांनी आळंदीतील पार्किंग आरक्षित असलेली वडगाव रोड ची जागा ताब्यात केव्हा घेणार आहात तसेच आळंदीमध्ये रस्त्यांच्या बाबत देव फाटा परिसरात डागडूजी करून मिळण्याची ही विनंती केली तसेच आपण तातडीने सिग्नल बसवण्याचे कामे आपणास जे पत्रव्यवहार केला आहे त्याबाबत कारवाई करावी अशी विनंती करत आपण जर हे करणार नसेल तर मी माझ्या वर्दीमध्ये आळंदी नगरपालिकेत येथेच उपोषणाला बसतो मग माझी नोकरी गेली तरी परवा नाही. अशा स्वरूपातला राग व्यक्त केला अर्थात हा राग बेशिस्त वाहनचालकांच्या पार्किंग बाबत होता. वाहनचालकांच्या नियम मोडण्याच्या विरोधात होता यासाठी आळंदी नगर परिषदेने वेळी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे ते वारंवार सांगत होते आपणाकडून काम होत नाही याची खंत वाटते अशी नाराजी व्यक्त करत आळंदीच्या नगर परिषदेतून ते बाहेर पडले हे सर्व होत असताना आळंदीत विविध कामासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना एक सुखद धक्का बसला की एक वेगळा प्रकारचा संदेश देणारे हे काम होतं आपली ड्युटी करत असताना बऱ्याच वेळा लोक कानाडोळा करतात परंतु नागरिकांना त्रास होतोय त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पोलीस निरीक्षक शहाजी पवार हे स्वतः नगर परिषदेत येऊन त्याचा पाठपुरावा करतात ही विशेष आश्चर्याची बाब नागरिकांना वाटली आणि शहाजी पवार गेल्यानंतर नागरिक मात्र त्यांच्या या कृतीबद्दल सुखद धक्का मिळाल्याने आश्चर्यकारक आणि स्तुती दायक चर्चा करू लागले.