DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी: कैलास माळी
धुळे: शिरपूर मध्यप्रदेशच्या शिमेलगतचा तालुका असल्यामुळे त्यातील गुन्हेगारी ही इतर तालुक्यांपेक्षा जास्त असते त्यामुळे तेथील कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी असते. गुन्हा दाखल झाल्यानंतर होणाऱ्या गुन्ह्याची उकल करून गुन्हेगाराला बेड्या ठोकणे फार मोठे जिगरीचे काम असते. शिरपूर तालुक्यातील थाळनेर मधील थाळनेर पो.स्टे गु.र.नं. ३० / २०२३ भादवि. ३०२ गुन्ह्यातील आरोपीना पोरबंदर गुजरात राज्यातून अटक करुन गुन्हा उघडकिस आणुन उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल सन्मानित करण्यात आले. सन्मान पत्रात नमूद केले आहे की, धुळे जिल्हा पोलीस दलासाठी आपण खालील नमुद केल्याप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करुन जिल्हा पोलीस दलास बहुमोल योगदान प्रदान केले आहे. यास्तव हे प्रशस्तीपत्र आपणास सन्मानपूर्वक देण्यात येत आहे.
थाळनेर पो.स्टे गु.र.नं. ३० / २०२३ भादवि. ३०२, एका अनोळखी तरुणाचा खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मक्याच्या शेतात फेकून दिला होता. अज्ञात मयत व अज्ञात मारेकरी यांचा शोध घेणे हे आव्हान होते परंतु आपण साक्षीदार, गुप्त बातमीदार, डम्पडेटा चे विष्लेशन व सी.सी.टी.व्ही फुटेज यांची सांगड घालुन मयताची ओळख पटवून आरोपीतांना पोरबंदर गुजरात राज्यातून अटक करुन गुन्हा उघडकिस आणुन उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल आसाराम आगरकर यांना जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.