DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : साक्री तालुका ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय, साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक दिन तहसील कार्यालय साक्री येथील सभागृहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान हे होते तर प्रमूख पाहूणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ.अजय सोनवणे, जिल्हा अध्यक्ष एडवोकेट.जे. टी.देसले, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंदा दाणेज, तहसीलदार श्रीमती आशा गांगुर्डे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, जिल्हा सहसंघटक पी.झेड् कुवर, साक्री तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें, सचिव विलास देसले, साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाऊ पारख, सहासंघटक डॉ. राजेंद्र अहिरे, ए. पी. दशपुते, सुहास सोनवणे, परिविक्षाधीन तहसीलदार राहुल मोरे, नायब तहसीलदार गोपाल पाटील आदि उपस्थित होते.
प्रारंभी साक्री येथील सी. गो. महाविलयाच्या प्रा. कढरे व विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हासहसंघटक पी.झेड्.कुवर यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम आलेल्या कु मेघा थोरात व कु ऋतुजा चव्हाण यांनी ग्राहकांची हक्क व कर्तव्ये, तसेच डिजिटल फसवणूक या विषयी तर प्रमुख अतिथी डॉ.अजय सोनवणे, ऍड. जे. टी. देसले प्राचार्य बी एम्.भामरे यांनी ग्राहक पंचायतीचा इतिहास, त्याची पंचसुत्री, दक्ष ग्राहक म्हणून घ्यावयाची काळजी, ग्राहक संरक्षण कायदा व त्याचे नवे स्वरूप आणि आर्थिक फसवणूकी बाबत जिल्हा, राज्य व केंद्र स्तरावर कार्यरत असलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंच व आयोग याविषयी माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांनी साक्री तालुक्यातील उपस्थित स्वस्त धान्य दुकानदार व वितरकांना आपण नागरिकांचे सेवक आहात ही भावना मनात ठेवून वितरण व्यवस्था उत्तम अमलात आणण्याचे आवाहन केले. तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र तर्फे प्रत्येक तहसील कार्यालयात ‘ ग्राहक कक्ष ‘ निर्माण करावा या बाबतच्या निवेदनावर सकारात्मक आश्वासित केले.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते प्रारंभीच करून सुरूवात झालेल्या या कार्यक्रमास साक्री तालुक्यातील सुमारे साठ-सत्तर स्वस्त धान्य दुकानदार व वितरक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अहिरे यांनी तर आभार प्रदर्शन परिविक्षाधीन तहसीलदार राहुल मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरवठा विभागाचे विनायक कोळी, सचिन कासार यांचेसह कार्यालयातील सहकार्यांनी सहकार्य केले.