DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनीधी – संजय गुरव
शहादा : शहादा येथील बस-स्थानका समोरील मुख्य रस्त्यावर असलेले आयंगर बेंगलोर बेकरी मध्ये पहाटे सकाळी 4 ते 5 वाजेच्या वेळेस चोराट्यांनी दुकान फोडून जवळ जवळ एक लाख रुपयांची रोकड रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी घडलेली आहे. या चोरी प्रकरणावर शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात चोरीचा गुन्हा नोंधन्यात आला आहे.
शहादा शहरातील बस स्थानका समोरील अय्यंगर बेंगलोर बेकरी अज्ञात चोरांनी पहाटे 4 ते 5 वाजे दरम्यान बेकरीच्या मागच्या बाजुचा शटर ला तोडण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते सफळ न झाल्याने चोरांनी बाथरुमच्या वरिल जाळीला तोडुन बेकरीचा आत प्रवेश केला. बेकरीमध्ये लाईट बील भरणा करण्याची रक्कम व दोन दिवसाची कमाई असे जवळ जवळ एक लाख रुपये रोकड होते. चोरांनी ती पुर्ण राक्कम लंपास करण्याची घटना घडली,सकाळी दुकानावर काम करणारे मजुर आल्यावर पाहीले असता गल्ला पुर्ण रिकामा होता व कपाटही अस्तव्यस्त केलेले होते,मागे पाहीले असता शटर तोडण्याचा प्रयत्न दिसुन आला होता व शेवटी बाथरुमची काढलेली जाळी दिसुन आली. हे सर्व पाहील्यावर बेकरीमध्ये मोठी चोरीची घटना घडली आहे असे तेथील कामगारांना दिसुन आले. हे सर्व वृत्तांत बेकरीचे मालक सागर शिवकुमार शेट्टीगीरे यांनी सांगितले. चोरीची घटना विषयी कळताचा शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत आपल्या कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी पोहोचले.तपास केला असता कळाले की 500 रुपयेचा 50 नोटा,200 रुपयांचा 100 नोटा,100 रुपयांचा 100 नोटा व 50 रुपयांचा 400 नोटा एकुण रोकड रक्कम चोरुन नेलेली आहे.चोरांनी दुकानात असलेले सि.सि.टी.व्ही.कँमेरांना सुध्दा नुकसान केलेले आहे.अजुन ईतर भागातही कुठ या चोरट्यांनी चोरी केली आहे का या बाबत तपास सुरु आहे.
दुकानाचे मालक सागर शिवकुमार शेट्टीगिरि यांची अज्ञात चोरट्यां विरोधात फिर्याद नोंधवण्यात आलेली असुन पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री चव्हाण करत आहेत.