DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- जयेश जाधव
कर्जत- एक्स्प्रेस खाली येणाऱ्या बासष्ट वर्षीय एका वयोवृद्ध इसम रेल्वे रूळ ओलांडताना पडला मात्र तेथे गस्त घालत असताना कर्जत लोहमार्ग पोलिसाने आपल्या जीवाची बाजी लावत प्राण वाचविले आहेत. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे दरम्यान या पोलीस कर्मचाऱ्याचे सर्व स्थरातून कौतुक होत असून पोलीस अंमलदार निकेश तुरडे असे या कर्तव्यदक्ष रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की दिनांक 12/05/2023 राेजी प्रवासी नामे – प्रशांत विजय चव्हाण वय – 62 वर्ष . राहणार- A- 712, साई दर्शन सोडेवाला लॉन बोरिवली (w). हे सकाळी 10:30 वा. च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्र – 02 वरून रेल्वे रुळ ओलांडत असताना प्लॅटफॉर्म क्र-1 वर गस्त करीत असलेले, पो. हवा 3316 पाटील, पो. शी 062-18 तुरडे, पो. शी 1198 शेख, पो. शी 553 मोहिते , पो. शी 1752 पेरनेकर, पो.शी 024 उमाळे, hg – दिघे असे गस्त करीत असताना सकाळी 10:30 च्या सुमारास पुणे दिशेकडून मुंबई दिशेकडे वेगाने जाणारी कर्जतला न थांबणारी गाडी नं -19668 हमसफर एक्स्प्रेस जात असताना एक वयस्कर इसम रेल्वे रुळ ओलांडत असताना भरधाव वेगाने येणारी गाडी पाहून घाबरून येणाऱ्या गाडीच्या रेल्वे रुळावर इसम पडला हे पाहताच मोटरमन ने गाडीचा स्पीड कमी केला वेळीच गुन्हे तपास पथकातील पो.शी 062-18 निकेश तुरडे हे तसेच त्यांच्यासोबत होमगार्ड 4705 दिघे या दोघांनी वेळेत धाव घेऊन तेथील वयोवृद्ध इसमास रुळावरून उचलून बाहेर केले व त्यांचे प्राण वाचवले.त्यामुळे कर्जत लोहमार्ग पोलिसांचे कौतुक होत आहे .