DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- जयेश जाधव
कर्जत: कर्जत तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील उमरोली आदिवासी वाडी, येथे आज, जनाई मेडिकल फाउंडेशन न व अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, यांच्या संयुक्त विद्यमाने आज उमरोली आदिवासी वाडीत मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जनाई मेडिकल फाउंडेशन मार्फत खूप निस्वार्थ मनाने करण्याचं कार्य, डॉ संतोष सदावर्ते, डॉ राकेश पाटील यांनी सहांनभुती दाखवून सेवा सुरू करण्याचं ठरवलं असून त्याला आदिवासी दुर्गम भागातील लोकांना आरोग्य योजनेची माहिती देऊन त्यांना मोफत वैद्यकीय उपचार सुरू करून त्यांना मोफत औषधोपचार केला जात आहे. या कार्याला हातभार अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे यांनी पुढाकार घेऊन आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचा एक भाग “एक समाज योध्दा”एक पाऊल समाज सेवेकडे”ही संकल्पना मनात ठेऊन जनाई मेडिकल फाउंडेशन सर्वेसर्वा डॉ, संतोष सदावर्ते हे नेहमीच सेवेसाठी तत्पर असतात, त्यात त्यांच्या या कार्याला अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली,यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य राहील ,जनाई मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आदिवासी वाडीतील ४०ते५० कुटुंबांना आजारपणात कोणत्याही प्रकारची फी (पैसे) घेतली जाणार नाही, निःशुल्क सेवा, मरे पर्यंत ही मोफत वैद्यकीय सेवा ,लहान मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, यांना इंजेक्शन,औषधे, रक्ताच्या चाचण्या, ड्रेसिंग,सलाईन,कोणतीही डॉ फी न घेता मोफत सेवा सुरू करण्याचा मानस डॉ सदावर्ते व सहकारी यांनी केला आहे, एक प्रकारे ही आदिवासी वाडी दत्तक घेऊन पुण्यच काम करणार असल्याचे सांगितले.
या वेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ सेल डॉ, संतोष सदावर्ते, डॉ राकेश पाटील, अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे, पहिलवान , दीपक सदावर्ते, पहिलवान राहुल सदावर्ते, प्रदेश कमिटी अध्यक्ष श् रतन लोंगळे, जयेश जाधव, तालुका सचिव प्रफुल जाधव, महिला अध्यक्षा कल्याण मालती गायकर ,अविनाश शिर्के, सोनल भागत, प्रची जाधव, संध्या कोल्हे, पुनम हजारे, यांच्या उपस्थित ग्रामस्थ पोलिस पाटील गणपत वाघमारे, गजानन वाघमारे, दिलीप पवार, राम पवार, अशोक वाघमारे, गीता नारायण मुकणे, ताराबाई पवार, शुभांगी पवार, लीलाबाई वाघमारे, अश्विनी जाधव, अंजना पवार, मंगल जाधव, लीलाबाई हीलम, यमुना मुकणे, लता वाघमारे, ताराबाई पवार,शुभम मुकणे, रामदास पवार, लक्ष्मण वाघमारे, हेमंत वाघमारे, रामदास हीलम, रोशन वाघमारे, नारायण मुकणे. आदी, आदिवासी ४०ते५० कुटुंबांनी सहभाग घेतला होता.