DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- रमजान मुलानी
तासगाव :- येथील इंदिरानगर
झोपडपट्टीतील सूरज उर्फ लल्या दिनकर शिंदे वय ३५ या तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी दिनकर किसन शिंदे यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
जानकी दीपक शिंदे, अजय जाधव, गोपाळ दीपक शिंदे व जतीन (पूर्ण नाव अजून निष्पन्न झाले नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी जानकी शिंदे हिला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत सूरज व सर्व संशयित हे एकाच कुटुंबातील आहेत. सूरज याने घरातील पिंप घेऊन गेला होता. यावरून संशयित आणि सूरज यांच्यात वाद सुरू होता. गुरुवारी सकाळी सूरज हा त्याच्या घरी जेवण करीत असताना संशयित जानकी या ठिकाणी आली. तिने सूरजला जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी जानकी हिने काठीने सूरजला डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी अन्य संशयित या ठिकाणी आले. संशयितांनी सूरजच्या गळ्यावर, खांद्यावर व हातावर चाकूने वार केले.. त्याच्या गळ्यावर वर्मी घाव बसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे सूरज हा जागेवर कोसळला. नातेवाईकांनी त्याला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. मृत सूरज याच्या विरोधात तासगाव पोलिसात दोन गुन्हे दाखल आहेत. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती, अशी माहिती तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बजरंग झेंडे यांनी दिली.