धुळे :- धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने निजामपूर येथील मंडळ अधिकारी विजय बावा यास 7 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भामेर या गावातील तक्रारदार यांनी त्यांचे शेत जमिनीची त्यांच्या कुटुंबाच्या नावे वाटणी करून खाते फोड करू नावावर करण्यासाठी निजामपूर मंडळ अधिकारी यांच्याकडे दि. 16 जुन 23 रोजी गेले असता तेथील मंडळ अधिकारी विजय बावा यांनी तक्रारदार यांच्याकडे 18000 रुपयाची लाचेची मागणी केली. तडजोडंती 15000 रुपये देण्याचे ठरले. अगोदर घेतलेले 8000 रुपये वजा जाता बाकी राहिलेले 7000 रुपये घेताना मंडल अधिकारी विजय बावा यास तक्रारदार यांच्या घरी पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ***सापळा पर्यवेक्षण अधिकारी *** लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे, पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, मपोशि. गायत्री पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी कारवाई यशस्वी केली.
▶ **मार्गदर्शक** –
*मा. श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर सो.* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र.
मो.न. 9371957391
मा. माधव रेड्डी सो अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. नाशिक
*मा.श्री नरेंद्र पवार सो*
वाचक, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि
नाशिक परीक्षेत्र.
मो. न. 7977847637
==================
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो,धुळे.*
संतोषी माता चौक धुळे.
*@ दुरध्वनी क्रं. 02562-234020*
*@ मोबा.क्रं. 8888881449, 9922447946,9657009727*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==============