DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- सोमनाथ पारसे बारामती
बारामती : माननीय श्री अजितदादा पवार साहेब, (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त कोऱ्हाळे खुर्द. तालुका, बारामती जिल्हा पुणे, या गावांमधील नागरिकांकरिता सौ. प्रणिता ताई मनोज खोमणे (व्हाईस चेअरमन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना) व श्री गोरख भाऊ खोमणे, (माजी सरपंच कोऱ्हाळे खुर्द) यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. आशाताई शरद खुडे यांच्या प्रयत्नातून कोऱ्हाळे खुर्द गावामध्ये विविध प्रकारचे भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी शरद नाना खुडे युवा मंच कोऱ्हाळे खुर्द यांच्या तर्फे गावातील सर्व नागरिकांनी पुढील प्रमाणे जाहीर केलेल्या सेवांचा लाभ घेण्यात यावा असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे बुधवार दिनांक 19 /07/ 2023 रोजी सकाळी ठीक 07 वाजता श्री बाळूमामा आदमापूर व श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर दर्शनासाठी गावातील सर्व महिलांना मोफत टूर अँड ट्रॅव्हल्स, व चहा नाश्ता महाप्रसाद भोजन मोफत दिले जाणार आहे. शनिवार दिनांक 22/07/2023 रोजी सकाळी 10 वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच सकाळी ठीक 11 वाजता माननीय श्री अजित दादा पवार साहेब मुख्यमंत्री होण्यासाठी श्री सोमेश्वर मंदिरामध्ये भव्य अभिषेक सोहळा श्री. शरद नाना खुडे यांच्यातर्फे होणार आहे. सायंकाळी सहा वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गावातील तुळजाभवानी मंदिरामध्ये फेवर ब्लॉक बसवणे व महाआरती कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर सायंकाळी 06 वाजून 30 मिनिटांनी खंडोबा मंदिर मंदिराचे अपूर्ण असलेले बांधकाम प्लास्टर पूर्ण करणे, व सायंकाळी 07 वाजता माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापणे व सभा, त्याचबरोबर शनिवार दिनांक 22/07/ 2023 रोजी रात्री 08 वाजून 30 मिनिटांनी भव्य भोजनाचा कार्यक्रम संपूर्ण गावासाठी आहे. त्याचबरोबर रविवार दिनांक 23/ 07 /2013 रोजी ते मंगळवार दिनांक 25 /07 /2023 पर्यंत मोफत आधार कार्ड कॅम्प आयोजित केलेला आहे. तसेच रविवार दिनांक 23/07/2023 रोजी मोफत सर्व शासकीय दाखले काढणे कामे आयोजित केलेली आहेत तसेच सोमवार दिनांक 07/08/2013 रोजी मोफत पॅन कार्ड व आभा कार्ड काढणे कॅम्प तसेच मंगळवार दिनांक 15/08/ 2023 रोजी भैरवनाथ विद्यालय कोऱ्हाळे खुर्द व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोऱ्हाळे खुर्द येथील सर्व मुलांना शालेय साहित्य वाटप व भोजनाचा कार्यक्रम या पद्धतीने सर्व कार्यक्रम यांच्या प्रयत्नातून श्री.शरद नाना खुडे युवा मंच यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. तरी गावातील सर्व नागरिकांनी महिलांनी याचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. तरी श्री. शरद नाना खुडे यांनी दर्शन पोलीस टाइम्स प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की सौ. प्रणिता ताई मनोज खोमणे (श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन ) तसेच (माजी सरपंच गोरख भाऊ खोमणे) यांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही बरीचशी कामे आपण विविध उपक्रमाच्या माध्यमातून कऱ्हाळे खुर्द गावातील नागरिकांसाठी राबवणार आहोत. तरी गावातील नागरिकांमधून या सर्व उपक्रमाची चर्चा होत असून गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.