DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री तालुक्यातील निजामपूर- साक्री रस्त्यावर दि १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०७:३० वाजेच्या सुमारास शिवाजी नगर जवळ नंदुरबार- पुणे बस व समोरून येणाऱ्या ट्रक ची धडक होऊन अपघात झाला.
अहमदाबाद कडे कांदे भरून जाणारा ट्रक MH41 AG 5252 व नंदुरबार कडून पुणे जाणारी बस क्र MH13CU6731 यांच्यात धडक झाली. बस च्या कंडक्टर बाजूस ट्रक ची डाव्या बाजूस धडक झाली. बस मध्ये ३७ प्रवासी होते.
चालक सागर गोरे आणि वाहक हरीष गणपत भोळे (नासिक आगार) यात जखमी झालेत इतर ५ प्रवाशांना दुखापती झाल्यात.
त्यांना साक्री येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.घटनास्थळी साक्री आगार प्रमुख किशोर अहिरराव यांनी धाव घेतली होती.
निजामपूर पोलीस ठाण्याचे चे एपीआय हनुमंत गायकवाड, पो.काँ दीपक महाले, अर्जुन पवार आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले होते.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने क्रेन मागवून रस्ता मोकळा करण्यात आला.
आगार प्रमुखांनी दुखापत झालेल्या प्रवाशांना तातडीची रोख मदत दिली. त्या शिवाय पी फॉर्म पण दिल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. धुळे विभागाचे एम. इ. ओ महाजन यांनी पण घटनास्थळी भेट दिली.