नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महानगरपालिकेचे अधिकारी आहेत कि भाजपचे पदाधिकारी ?महानगरपालिका व अधिकाऱ्यांची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष घेतात. हे आयुक्तसाठी लाजिरवाणे***

DPT NEWS NETWORK 🗞️✍️

काल धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर यांनी प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी यांची बैठक घेतली. एखाद्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बैठक घेणे आणि अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहून उत्तर देणे हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. हा चुकीचा पायंडा आहे. यामुळे जनते मध्ये चुकीचा संदेश जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी काही नियम असतात व काही प्रोटोकॉल सुद्धा असतात. परंतु धुळे महानगरपालिकेमध्ये ज्या दिवशी भाजपा जिल्हा अध्यक्षांनी बैठक घेतली तेव्हा सर्व प्रशासकीय नियम व प्रोटोकॉल धुळीस मिळाले आहेत. आयुक्त सारख्या मुख्य पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने असे बैठकीला उपस्थित राहून उत्तर देणे लाजिरवाणे आहे. धुळे महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि त्यांचे निर्णय घ्यायचे सर्व अधिकार हे नगरसेवकांना आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवकांना निवडून दिलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे जिल्हा


महानगर पालिकेत भाजपचे सरकार आल्यानंतर धुळेकर नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल असे वाटत होते. एकहाती सत्ता दिल्यानंतर धुळ्याचा विकास करु अशी वल्गना करणारे भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी धुळ्याचा काय विकास केला हे धुळेकर जनतेने मागील पाचा वर्षांत पाहिले आहे. मोठी-मोठी आश्वासने देवून हे सत्तेवर आले. पण धुळ्यात न एकदिवसाआड पाण्याचा प्रश्न सुटला, न कच·याचा, न रस्त्यांचा, न घंटागाड्याचा, एक ना अनेक अशा समस्यांचा धुळेकर नागरिक सामना करीत आहेत. अशा वेळी एका कर्तव्यदक्ष अधिका·याची भूमिका आपण पार पाडाल अशी सर्वसामान्य धुळेकर नागरिक अपेक्षा करतो. पदाधिकारी जर कामे करीत नसतील तर प्रशासनातील अधिका·यांनी ती करावीत एवढी माफक अपेक्षा नागरिकांची असते. परंतू आपण सर्व अधिकारी एवढे निगरगट्ठ झाला आहात की आपल्याला कितीही काहीही बोला आपणांस काही फरक पडत नाही. अशा कित्येक बैठका, आंदोलने, मोर्चे, विविध प्रश्नासाठी महानगरपालिके मध्ये झाल्या. परंतु तू मला मारल्यासारखं कर, मी रडल्या सारखे करतो. ही तुमची सर्व मिलीभगत जनता मागील काही वर्षांपासून पाहत आहे. हा सर्व प्रकार राज्यात फक्त धुळे महानगरपालिकेत चालू आहे.
जनतेच्या पैशातून महानगरपालिकेचे कामकाज चालते, कदाचित याचा विसर आयुक्त व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी यांना पडलेला आहे. आयुक्त व सर्व अधिकारी यांची नियुक्ती सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. कदाचित अधिकाऱ्यांना याचा विसर पडलेला आहे. आज धुळे महानगरपालिकेचे अधिकारी हे जणू काही भाजपाचे पदाधिकारी आहेत असे वागत आहेत. आयुक्त व इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती ही भाजपानेच केली आहे असे कदाचित त्यांना वाटत असेल. महानगरपालिका ही लोकप्रतिनिधीचे सभागृह आहे ते पक्षाचे कार्यालय नाही कोणत्याही राजकीय दबावला आयुक्त व अधिकाऱ्यांनी बळी न पडता जनतेसाठी योग्य निर्णय घ्यावे अशी अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा चुकीच्या पायंडाचा निषेध करीत आहे. अशी चुकीची प्रथा अगर अधिकारी पाडत असेल तर कदाचित याच्यापुढे आम्हालाही अधिकाऱ्यांना समजतील असे चुकीचे निर्णय घ्यावे लागतील. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी दिला आहे.
असे पत्रक रणजीत राजे भोसले यांनी काढले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:19 am, January 13, 2025
temperature icon 20°C
साफ आकाश
Humidity 45 %
Wind 6 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!