DPT NEWS NETWORK 🗞️✍️
हिंगोली : महाराष्ट्रात पोलीस विभाग नियमित संकटकाळी मदतीसाठी धावून येत असते मग क्राईम विषय असो अपघात विषय असो सर्व गोष्टीला पोलीस मदतीस येत असतात त्यामुळे जनतेला देखील त्या मदतीपासून दिलासा मिळत असतो. त्यात हिंगोली पोलीसही मागे नाहीत. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली हिंगोली पोलीस दल नेहमीच दक्ष राहुन आपले कर्तव्य करीत आहेत. दिनांक- १०/०८/२०२३ रोजी पोलीस स्टेशन कळमनुरी अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ जवळ अॅम्बुलन्स व मोटार सायकल यांचेत अपघात होवुन मोटार सायकल के. एम. एच. ३८ • एच ६६२० वरील पुरूष नामे – बाबाराम गंगाराम गिराम वय अंदाजे ५० वर्ष व महीला नामे- मिराबाई बाबाराम गिराम वय अंदाजे ४५ वर्ष रा. सावळी ता. औंढा नागनाथ हे गंभीररित्या जख्मी होवुन रोडावर पडले होते. त्याबाबत माहीती कळताच पोलीस स्टेशन कळमनुरीचे प्रभारी अधिकारी वैजनाथ मुंढे हे सोबत अंमलदार शिवाजी देवगुंडे यांचेसह जलदगतीने अवघ्या १५ मिनीटात घटनास्थळी पोहचले व अपघातात वरील दोन्ही इसम गंभीररित्या जख्मी असल्याने व त्यांना तातडीने उपचाराची गरज ओळखुन पो.नि. मुंढे यांनी त्यांचे अंमलदार व नागरीकांच्या मदतीने तात्काळ दोन्ही जखमींना स्वतः जवळ असलेल्या पोलीस वाहनातुन उपचारासाठी सरकारी दवाखाणा येथे आणुन भरती केले. सरकारी दवाखान्यात दोन्ही जखमींवर डॉक्टरांनी तात्काळ प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचाराकरीता नांदेड येथे रेफर केले. पोलीस निरीक्षक श्री. वैजनाथ मुंढे यांनी माहीती मिळताच तात्काळ अपघताच्या घटनास्थळी दाखल होवुन कोणतेही विलंब न होवु देता स्वतः जवळील पोलीस वाहनातून जखमींना उपचारासाठी सरकारी दवाखाण्यात दाखल त्यामुळे दोन्ही जखमींना तात्काळ वैदयकिय उपचार मिळाला.
अपघाताच्या या गोल्डन (golden hours) हवर्स मध्ये जनतेने देखील पोलिसांना सहकार्य करून मदतीस हातभार लावला पाहिजे व जेथे पोलीस नसतात तेथे जनतेने गोल्डन हवर्स (golden hours) मध्ये मदत करून रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी ही जनतेची देखील मानवतेच्या दृष्टिकोनाने जबाबदारी आहे.