DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असंख्य तरुण व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांवर तसेच तसेच प्रदेशअध्यक्ष श्री जयंतराव पाटील साहेब,संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्री रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली असंख्य तरुणांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
सदर कार्यकर्त्यांना ज्येष्ठ नेते एन.
सी. पाटील व राष्ट्रीय खजिनदार श्री जोसेफ मलबारी यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला. प्रवेश घेणाऱ्यांमध्ये साक्री रोडवरील तुषार वाघ त्यांचे सहकारी, मुस्लिम भागातील सामाजिक कार्यकर्त समाजवादीचे पदाधिकारी जाकीर शेख, वाडीभोकर रोडचे युवा नेतृत्व आकाश बैसाने व त्यांचे सहकारी, देवपुरातील वैभव पाटील व त्यांचे सहकारी, नकाणे रोडचे मयुर शिंदे तसेच माजी सैनिक युनुस शेख, युसुफ शेख, एअर फोर्सचे सेवानिवृत्त अधिकारी युनूस मिर्झा, अंकुश पाटील, शरद अहिरे, प्रशांत गवळी, राहुल चव्हाण, यश पाटणी, आदी युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या.यावेळी पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी, महिला, जेष्ठ,कार्यकारणी सदस्य, विविध आघाडीचे /सेलचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.
सर्वांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर काम करण्याचा निर्णय घेतला.