पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा व आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केल्या प्रकरणी कारवाई करा सर्व संघटनेची तहसीलदार सोनवणे यांना निवेदनाद्वारे मागणी
*DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
साक्री : राज्यात पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे पत्रकार संरक्षण कायदा अस्तिवात असताना त्याची अंमलबजावणी होत नाही. या निषेधार्थ साक्रीत पत्रकारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवत या संरक्षण कायद्याची साक्री शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती होळी करून रोष व्यक्त केला.
तसेच तहसिलदार सुरेश सोनवणे यांना निवेदन देऊन कायद्याची सक्त अंमलबजावणी आणि आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली यावेळी प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, मार्गदर्शक जी.टी. मोहिते, भानुदास गांगुर्डे, अध्यक्ष बाळकृष्ण तोरवणे, कार्याध्यक्ष जगदीश शिंदे, सचिव प्रा.डॉ.लहू पवार, उपाध्यक्ष शरद चव्हाण, सहसचिव संगपाल मोरे, कोषाध्यक्ष रवि खैरनार सदस्य विद्यानंद पाटील, संजय काकुळते, जितेंद्र जगदाळे, जन ग्रामीण पत्रकार संघाचे साक्री तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, उपाध्यक्ष अकिल शहा, ज्ञानेश्वर ढालवाले, कल्पेश मिस्तरी, सूर्यकांत बच्छाव, प्रविण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर शिवदे, राजेंद्र अहिरराव, विलास देसले, तुषार ढोले, प्रविण काकुस्ते, चंद्रशेखर अहिरराव, राजेद्र अहिरराव, मराठी पत्रकार संघांचे मार्गदर्शक कॉ. सुभाष काकूस्ते, अध्यक्ष विजय भोसले, कार्याध्यक्ष महेंद्र चंदेल, सचिव लक्ष्मीकांत सोनवणे, पी.झेड. कुवर, रघुवीर खारकर, अंबादास बेनुस्कर, सागर काकुस्ते, अमृत सोनवणे, बी.एम. भामरे, हेमंत महाले, धनंजय सोनवणे,भटू वाणी, शैलेश गादेकर, रतनलाल सोनवणे, हरिष मंडलिक यांच्यासह तालुक्यातील विविध दैनिकांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.