DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी येथील जि.प. केंद्र शाळेला नाशिक येथील सुप्रसिद्ध उद्योजक साहेबराव साळुंके यांच्या वतीने 6 एल्ईडी बल्ब चे संच वाटप करण्यात आले, शासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळून सुद्धा पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा असल्या कारणाने कल वाढत आहे आज जिल्हा परिषद शाळेत काही ठिकाणी वीज आहे तर लाईट नाही तर काही ठिकाणी वीज जोडणी सुद्धा नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे काही ठिकाणी शासनाने संगणक संच देऊन सुद्धा त्या ठिकाणी शाळेला विजेचा पुरवठा करण्यात न आल्या कारणाने आज ते संच धूळखात पडले आहे जिल्हा परिषदेत शाळेत आज गरीबाची मुलं शिक्षण घेत आहेत, आज त्यांच्या जीवनात व शिक्षणात प्रकाश यावा म्हणून काही सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती हातभार लावत आहेत असाच एक प्रकार शेवाळी गावातील नाशिक येथे स्थित सुप्रसिद्ध उद्योजक साहेबराव साळुंखे यांनी आपल्या गावातील गरीब विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेताना अंधारात शिक्षण न घेता उजेडात शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी त्यांच्या वतीने 6 एलईडी बल्ब चे वाटप केले त्यांच्या या कार्यामुळे गावातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे यावेळी ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष साहेबराव साळुंखे, सचिव सुरेश साळुंखे, रमेश साळुंखे, प्रभाकर साळुंखे, उखाजी साळुंखे, जि.प.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक नाना साहेब सोनवणे, शिक्षिका
चंदनबाई सोनवणे, प्रतिभा सांळूके, मृणाल अहिरराव,संगीता अहिरे, चित्रंगा, भावसार, रेविता लोखंडे, दिपक देवरे आदि उपस्थित होते.