DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सोमनाथ पारसे
बारामती : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 15 ऑगस्ट 2023 रोजी, देशसेवा केलेले माजी सैनिक व पोलीस दलातील शिपाई यांचा ग्रामपंचायत कोऱ्हाळे खुर्द यांच्यामार्फत सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. आणि मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत विर जवानांना मानवंदना देण्यासाठी हुतात्मा कोनशिला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोऱ्हाळे खुर्द येथे बनविण्यात आली, व त्यांचे उद्घाटन गावातील ग्रामपंचायत बाॅडीचा कार्यकाल संपला असलेने माजी सैनिक व पोलीस दलातील जवान व गावातील सन्मानिय प्रतिष्ठीत नागरिक यांच्या हस्ते घेण्यात आले. त्यावेळी माजी सैनिकांनी सदर कोनशिलेस मानवंदना देऊन तेथील ध्वजारोहण करण्यात आले. व नंतर गावामधुन शाळेतील मुलांसह माजी सैनिक व पोलीस दलातील जवान व गावातील ग्रामस्थांनी प्रभात फेरी काढून गावातील 8 ते 10 ठिकाणी असणाऱ्या शासकीय व निमशासकीय कार्यालयांवरील ध्वजारोहण कार्यक्रम माजी सैनिक व पोलीस दलातील जवानांच्या हस्ते करत शेवटी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणचा ध्वजारोहण कार्यक्रम सर्वच माजी सैनिक व पोलीस दलातील जवानांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी सर्व माजी सैनिकांचे मन अगदी भारावून गेले व त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल त्यांना खूप अभिमान वाटला व तो आनंद सोहळा पाहुन सर्व शाळकरी मुलांना देशाविषयी अभिमान वाटला व आपणही या भारतमातेचे रक्षणासाठी काहीतरी केले पाहिजे, त्यासाठी बॉर्डरवरच जाऊन नव्हे तर आपल्या गावातील वेगवेगळ्या प्रकारातून लोकांची मदत करणे, स्वच्छता अभियान राबविणे, वृक्षारोपण करणे, प्लास्टिक व कचरा मुक्त गाव करणे, गावातील लोकांचे आरोग्य अबाधित ठेवणे असे उपक्रम राबवून देशसेवा केली पाहिजे असे सर्वांना वाटू लागले.
त्यानंतर मुलांची स्वातंत्र्य दिनाविषयी भाषणं झाली व नंतर गावातील सन्मानिय प्रतिष्ठीत नागरिकांचे हस्ते माजी सैनिक व पोलीस दलातील जवान यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित माजी सैनिक 1. चंद्रकांत गायकवाड 2. रामचंद्र खुडे 3. बापुराव खोमणे 4. प्रताप खोमणे 5. नवनाथ खोमणे 6. वेणुनाद ढोपरे 7. अदिक शिंदे 8. नानासो शिंदे 9. शिवाजी शिंदे 10. जयवंत भोसले 11. शंकर लव्हे 12. सध्या कार्यरत असलेले व सुट्टीसाठी आलेले अमोल शिंदे अशा सैनिकांचा ग्रामपंचायत कोऱ्हाळे खुर्द यांच्यामार्फत सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. व शेवटी सर्वांना खाऊ वाटप करुन कार्यक्रम संपवून भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देत कार्यक्रमाचा समारोप झाला. असे देशसेवा विषयी व सैनिकांवर अधारीत कार्यक्रम गावोगावी सतत होत राहिले तर मुलांना यातुन देशसेवा करण्याविषयी खुपचं जास्त आवड निर्माण होईल व त्यासाठी मुलं भरतीसाठी खुप प्रयत्न करत राहतील असे चित्र यातुन पाहायला मिळते.