DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी-गोरगल्ले* पोलीस स्टेशन हद्दीत पुणे नाशिक हायवे रोडवर 15 ऑगस्ट रोजी सकाळी अकराचे दरम्यान स्वातंत्र्य दिनाचे उपचारित्य साधून भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या बुलेट चालकांवर तसेच बुलेट गाडीचा फटाक्या सारखा आवाज काढणारे रोड रोमिओ यांच्यावर खेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 15 ऑगस्ट दिनी धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई माननीय सुदर्शन पाटील साहेब उपविभागिय पोलीस अधिकारी साहेब खेड विभाग खेड यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली व माननीय राजकुमार केंद्रे पोलीस निरीक्षक,पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर राऊत, डी पी पथकाचे पोलीस हवालदार संतोष मोरे, पोलीस नाईक गेंगजे, पोलीस अंमलदार योगेश भंडारी, पोलीस अंमलदार सागर शिंगाडे, वाहतूक विभागाचे सहायक फौजदार लक्ष्मण नर्हे सहाय्यक फौजदार बबन भवानी पोलीस कॉन्स्टेबल संजय पावडे व पोलीस हवालदार विजय राहतेकर यांनी आज 5 बुलेट गाडी व एक यामाहा गाडी ताब्यात घेऊन सदर गाडी चालविणारे अल्पवयीन बालक यांना खेड पोलीस स्टेशनमध्ये आणून संबंधितांचे नातेवाईक यांना खेड पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले व सदर ताब्यात घेण्यात आलेल्या गाड्यांवर महाराष्ट्र पोलीस मोटार वाहन कायदा कलमान्वये साधारण पन्नास हजार रुपये दंड आकारण्यात आला. सदरची कारवाही खेड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व महाविद्यालयात व सर्व शाळा परिसरामध्ये अचानकपणे करण्यात आली व ती पुढे सतत अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत श्री राजकुमार केंद्रे पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन यांनी प्रसार माध्यमांना दिली.