DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी :- सोमनाथ पारसे
बारामती :- सुपा पोलिसांनी अवैध विनापरवाना वाळू उपसा करणारे वाळू तस्कर केले जेरबंद
दि.30/08/2023 रोजी पहाटे 03/00 वा.चे सुमारास सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे काऱ्हाटी गावचे हद्दीत कऱ्हा नदी पात्रामध्ये अवैद्यरित्या वाळू उपसा चालू असले बाबत गोपनीय माहिती बातमीदारांमार्फत प्राप्त झालेले सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नगनाथ पाटील पो .हवा /1834 राहुल भाग्यवंत पो. अंमलदार/1634 सचिन दरेकर ,होमगार्ड /3913 धायगुडे असे मिळून खाजगी वाहनाने रवाना होऊन मौजे काऱ्हाटी गावातून मौजे जळगाव या गावाकडे जाणारे रस्त्याचे कडेला अंधारात दबा धरून बसले असता, 03/30 वा.चे दरम्यान जळगाव कडून गावातून दोन संशयित ट्रक लाईट बंद करून काऱ्हाटी गावचे दिशेने येताना दिसल्या. सदर संशयित ट्रकला हात करून थांबवून चालकाकडे चौकशी केली असता दोन्ही ट्रकमध्ये अवैद्यरित्या विनापरवाना वाळू असल्याचे निष्पन्न झाले. अवैद्य वाळू वाहतूक करणारे ट्रक चालक यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सदरचे ट्रकचे मालक हे पाठीमागे स्विफ्ट गाडीमध्ये आहेत असे सांगितले सदरची स्विफ्ट कार नं. एम .एच 12 एन.ई 7881 व त्यातील दोन इसमांना ताब्यात घेऊन सुपा पोलीस स्टेशन येथे आणून ट्रक चालक 1) महेश राजेंद्र यादव वय 31 वर्ष रा .मरूम ता. उमरगा जि .उस्मानाबाद 2) चेतन मारुती वाबळे वय 25 वर्ष रा .उरुळी कांचन ता .हवेली जि. पुणे ,ट्रक मालक 3) आकाश रावसाहेब व्यवहारे रा. लोणी काळभोर ता .हवेली जि. पुणे 4) नामदेव पोपट वाघमोडे रा.उरळी कांचन ता .हवेली जि. पुणे व वाळू भरून देणारे 5) देवा जगताप पूर्ण नाव माहित नाही रा .जळगाव ता. बारामती जि. पुणे यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता, कलम 379,34 पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9,15 सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम 3,4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई मध्ये 10 ब्रास वाळू किंमत अंदाजे 80,000/-रु टाटा कंपनीचा ट्रक नं एम. एच .12 डी.जी.0442, टाटा कंपनीचा ट्रक नं. एम .एच .12 एन . अशा दोन ट्रक किं.अं.30,00,000/-रु, एक स्विफ्ट कार नं. एम . एन. ई 7881किं.अं.3,00,000/-असा एकूण 33,80,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील चार आरोपींना अटक करण्यात आली व 01 आरोपी फरार आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे हे करीत आहेत. सदरची कारवाई ही श्री. अंकित गोयल सो पोलीस अध्यीक्षक पुणे ग्रामीण, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आनंद भोईटे सो बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे सो उपविभागीय बारामती, सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सहा. फौजदार रवींद्र मोहरकर, पो. हवा/1834 राहुल भाग्यवंत, पो.ना/2379 अनिल दणाणे,पो.ना./1361 संदीप लोंढे, पो.कॉ./1634 सचिन दरेकर, पो. कॉ./1380 तुषार जैनक, होमगार्ड/3913 दीपक धायगुडे, होमगार्ड/2902 रवींद्र धायगुडे यांनी केली आहे.