DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अनिल डाके
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपून देखील अनेक विशेष कार्यकारी अधिकारी सही शिक्क्यांचा बेकायदेशीर वापर सुरूच असल्याने विशेष कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना नियुक्ती दिनांक पासून त्यांचा पाच वर्षाचा कालावधी संपला असताना देखील विशेष कार्यकारी अधिकारी यांनी स्थानिक पोलीस ठाणे तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये साहित्य जमा करणे बंधनकारक होते. परंतु साहित्य जमा केली गेली नाही.
विशेष कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या नियुक्ती आदेशामध्ये सर्व सूचना शासनाने दिलेल्या आहेत त्या सूचनांचे पालन करून कालावधी पूर्ण झालेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांनी सही शिक्का साहित्याचा बेकादेशीर वापर सुरूच ठेवला आहे. याबाबत इचलकरंजी येथील जनग्रामीण पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय सनदी यांनी जिल्हाधिकारी यांच्या गृह शाखेकडे माहिती मागणी केली होती. यातून विशेष कार्यकारी अधिकारी बाबतीतला जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेचा कारभार कसा आहे हे दिसून आले आहे.
गृह शाखेकडे मागणी केली माहितीमध्ये दहा वर्षापासून अधिक एकाही विशेष कार्यकारी अधिकारी यांनी शासन आदेशाची अंमलबजावणी केलेली नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय गृह शाखेने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व सर्व पोलीस ठाण्यांना पत्र व्यवहार करून विशेष कार्यकारी अधिकारी साहित्य वापर करीत असलेल्या व्यक्तींवर कारवाई करून शिक्का जमा करून घेण्यात यावेत ज्यांनी साहित्य जमा केले नाही, त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करावी असे उप जिल्हाधिकारी भगवानराव कांबळे यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. याबाबत गृह शाखेकडून अनेक पत्र व्यवहार व पत्र प्रथम स्मरण पत्राद्वारे कळविले असताना देखील जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांनी अद्याप विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. काही विशेष कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सही शिक्याचे रजिस्टरचा वापर करून नोंद ठेवणे बंधनकारक आहे काहींनी रजिस्टर नोंदी ठेवल्या नसल्याने सही शिक्याचा बेकायदेशिर वापर करणा-यांना तपासले जाणार आहेत. यातिल काही विशेष कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे रजिस्टर हरवले असल्याचे जिल्हाधिकारी गृह शाखेस लेखी दिलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय परिसरामध्ये व कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहरांमध्ये संजय गांधी योजने करिता, शैक्षणिक कामासाठी, निवडणुकीसाठी, आर्थिक व्यवहार करिता, अनेक शासकीय कामासाठी अश्या अनेक कामासाठी विशेष कार्यकारी अधिकारी मुदत संपले असलेल्यांनी साहित्याचा वापर सुरूच ठेवलेला आहे यातून अनेक अपात्र व्यक्तींना पात्र ठरविण्यात येवून योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. तर काही विशेष कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांचे कागदपत्रे अधिकृत करण्यासाठी प्रत्येकाकडून दहा रुपये प्रमाणे पैसे आकारले जात आहेत. जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांची साहित्य जमा करताना रजिस्टर तपासले जाणार आहे. बेकायदेशीर वापर केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई होणार असे असल्याचे उप जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.