DPT NEWS NETWORK 🗞️✍️
नंदुरबार – रविंद्र गवळे
नंदुरबार: शहादा तालुक्यातील वडाळी येथील सर्वात मोठे २४/७ मदर पी.एच.एस.सी म्हणून ओळख असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त, वारंवार गैरहजर वैद्यकीय अधिकारी, वाऱ्यावर सोडलेले आरोग्य केंद्र, यामुळे हे आरोग्य केंद्र नेहमीच चर्चेत असते.
येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी केल्यानंतर कोट्यवधी रुपये खर्च करून नूतन इमारत बांधून पूर्ण करण्यात आली, मात्र यात योग्य त्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. तर दोन पैकी एकही वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी मुख्यालयी थांबत नाही. कर्मचारी अपुरी संख्या त्यामुळे नेहमीच रुग्णांची हेळसांड होते. या केंद्रांतर्गत सात उपकेंद्रे आहेत. त्यातीलच एखाद्या कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्यास रुग्ण सेवा करण्यासाठी बसवलं जाते. ग्रामपातळीवर योग्य समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा रुग्णांना असते. रोजच नवीन वैद्यकीय अधिकारी दिसतो असा प्रत्येय रुग्णांना येतो, मात्र या केंद्रात आरोग्य अधिकारीच नसल्याने रुग्णांचा हिरमोड होतो. वडाळी हे गांव अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील बाजार पेठेचे मोठे गांव असल्याने याठिकाणी अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. रुग्णांची संख्या लक्षणीय असते २० ते २२ गावांचा नागरिकांचा संपर्क या आरोग्य केंद्राशी नेहमी आरोग्य सेवा घेण्यासाठी येत असतो. अनेकवेळा वेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलवून जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात येते. सतत गैरहजर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे
*अपूर्ण कर्मचारी संख्या अन उदासीन प्रशासन*
वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्र असुन त्यात आरोग्य सेविका आरोग्य सेवक अशा अनेक कर्मचारी जागा रिक्त आहेत.तर वडाळी आरोग्य केंद्रात
आरोग्य;सेविका आणि आरोग्यसेवक, परिचर दोन, आंतरबाह्य रुग्णसेविका, औषध निर्माता असे एकून पाच ते सहा पदे रिक्त आहेत.वेळोवेळी पाठपुरावा करुनही आरोग्य विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. आरोग्य केंद्रात कंत्राटी कर्मचारी रुग्णांशी असभ्य वागत असतात.असा प्रत्यय रूग्णांना नेहमीच येतो तर काही कर्मचारी दारूच्या नशेत टल्ली असतांना दिसून आल्याचे रूग्णांनकडून चर्चा देखील होते.यामुळे रुग्णांमध्ये प्रचंड नाराजी आहे.तसेच वडाळी आरोग्य केंद्राचा उपकेंद्रावर नेमलेल्या आरोग्य सेवकांनी पाठ फिरवली असल्याची तोंडी तक्रार नेहमी होत असल्याचे निदर्शनास येते.अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
*प्रतिक्रिया -*
वडाळी आरोग्य केंद्रातील ढिसाळ कारभाराला ग्रामस्थ व ग्राम पंचायत प्रशासन हतबल झालं असून, वेळोवेळी सांगून देखील संबंधित आरोग्य अधिकारी लक्ष देत नसल्याने व रुग्ण कल्याण समितीची बैठकही घेत नसल्याने हे आरोग्य केंद्र रामभरोसे आहे. नियमित अपूर्ण कर्मचारी संख्येच्या नावाने बोलले जात असल्याने संबंधित विभागाने कर्मचारी संख्या वाढवावी.
अभय गोसावी
उपसरपंच, वडाळी