शिक्षण अधिकाऱ्यांना दिले निवेदन
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- भरत चव्हाण तळोदा
नंदुरबार : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक दिनी 5 सप्टेंबर रोजी काळया फिती लावून आंदोलन करणार आहेत. याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना दिले. यावेळी वेतन अधिक्षक प्रमोद पाटील , सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर बी पाटील उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या निराकरणासाठी महासंघाने वारंवार प्रयत्न पाठपुरावा करून शिक्षकांचे प्रश्न सुटत नसल्याने अखेरीस बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी महासंघाशी चर्चा देत काही मागण्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. महासंघाने आपला बहिष्कार मागे घेतला व बारावीचे उत्तर पत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केले, मात्र या मागण्यावर सरकारने अद्याप कोणताही आदेश काढला नाही. तसेच महासंघाने वारंवार भेटी घेऊन निवेदने देऊनही शिक्षण विभाग केवळ वेळ काढत आहे. तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर चर्चेसाठी वेळ देत नाही असा आरोप महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केला आहे. त्यामुळेच शिक्षक दिनी काळया फीत लावून आंदोलन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, वाढीव पदांना नियुक्ती दिनांक पासून मान्यता व वेतन द्यावे, आय टी शिक्षकांना वेतनश्रेणीत वेतन द्यावे शिक्षकांना 10, 20, 30 वर्षाच्या आश्वासित योजना लागू करावी, वर्गातील विद्यार्थी संख्या शाळा संहितेतील तरतुदीनुसार असावी. आदी मागण्या संघटने कडून करण्यात आले आहेत. निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रा. एस एन पाटील जिल्हा सरचिटणीस प्रा गणेश सोनवणे , जिल्हा उपाध्यक्ष प्रा आसिफ शहा, प्रसिद्धी प्रमुख प्रा सुनिता शिंदे , जिल्हा सहसचिव प्रा भरत चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रा प्रशांत बागुल तालुका उपाध्यक्ष तुषार पाटील, सदस्य प्रा संजोगता गिरासे सदस्य, प्रा आर आर नोळे आदींच्या सह्या आहेत.