DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश कर्डिले
नाशिकः मा. पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार / तडीपार आरोपी यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सदर कारवाई बाबत मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी कारवाई करणेबाबत गुन्हेशाखा युनिट क्रमांक १, नाशिक शहर यांना मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी यांचा शोध घेत असतांना पोना / १८८३ विशाल काठे यांना गुप्त बातमीदार यांचे | मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी पांडुरंग उर्फ पांडया हनुमंत शिंगाडे व त्याचासोबत एक इसम है। संदर्भसेवा रुग्णालय शालीमार नाशिक या परीसरात चोरीचे मोबाईल विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली व सदरची माहीती वपोनि. विजय ढमाळ यांना कळविली असता, त्यांनी सपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / १३१६ नाजिम पठाण, पोना / १९०० विशाल देवरे, पोना / १८८३ विशाल काठे, पोअं/ २४५० राजेश राठोड अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने वरील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे संदर्भसेवा रुग्णालय शालीमार नाशिक या ठिकाणी छापा लावुन आरोपी नामे १) गणेश शाम जाधव, वय-२१वर्षे, रा- घर नं ४३ हिंदु समाज सेवा मंदिरासमोर, म्हसोबावाडी गंजमाळ नाशिक, २) पांडुरंग उर्फ पांडया हनुमंत शिंगाडे, वय- १९ वर्षे, रा-दुर्गामाता मंदिराशेजारी, पंचशिलनगर गंजमाळ नाशिक असे सांगुन त्यांचे कडुन गुन्हातील चोरीस गेलेले मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण ९०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली दिल्यावरून म्हसरूळ पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुरनं १८० / २०२३ भादवि कलम ३७९, ३४ हा उघडकीस आला आहे. सदर आरोपी नामे पांडुरंग शिंगाडे हा भद्रकाली पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील आरोपी सध्या तडीपार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर आरोपी हा भद्रकाली पोलीस ठाणे कडील गुरनं ९२ / २०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ५०६, १४३, १४७, १४९ तसेच मपोका कलम १३५ या गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन झाले. तरी सदर दोन्ही आरोपींताना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. अंकुश शिंदे सो. मा. पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, प्रशांत बच्छाव सो. मा. सहा. पोलीस आयुक्त सो. डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, सपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / १३१६ नाजिम पठाण, पोना / १९०० विशाल देवरे, पोना / १८८३ विशाल काटे, पोना / ३७७ प्रशांत मरकड, पोअं/ २४५० राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख यांनी केली आहे.