DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – योगेश गवळे
नाशिकः गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत
मित्राची बाजू का घेतो म्हणून किरकोळ वादातून दोन जणांनी मिळून एकाचा खून केला.घटना शनिवार रात्री घडली याप्रकरणी समशेद रफिक शेख दीपक अशोक सोनवणे दोन संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वकांत उर्फ बबलू भीमराव पाटील वय 27 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तालयाची हद्दीतील गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे अंबड पाठोपाठ गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
घटनास्थळी पोलीस उपायुक्त स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी एस आर पी ते जवान दाखल झाले आहे.