DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रा.नागेंद्र जाधव
सावंतवाडी :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत लोकशाही गप्पा वर चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रामध्ये राज्य मुख्य निवडणूक अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण या विषयावर लोकशाही गप्पा या सदराखाली शिक्षक दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा अभ्यासक डॉ प्रकाश परब, मराठी अभिनत्री संपदा जोगळेकर, सामजिक कार्यकर्त्या वंदना करंबलेकर, प्राचार्य शम्मसुद्धिन अत्तार, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे या वक्त्यांनी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हयाचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, भोसले नॉलेज सिटीचे कार्यकारी अध्यक्ष अच्युत सावंत भोसले आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
सदर कार्यक्रमाला श्री पंचम खेमराज विधी महाविद्यालयातील प्राध्यापिका पूजा जाधव, यांच्यासह विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन, आभार डॉ. दीपक पवार यांनी केले.