DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी- नारायण कांबळे.
क्रांतिबा महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त भिमा कोरेगावच्या रणांगणाचा इतिहास हा नाटकाच्या माध्यमातून कोल्हापूरचे आपलेच हौशी कलाकार प्रत्यक्ष रंगभूमीवर घेऊन येत आहेत. ज्याच्या लेखनासाठी व सेन्सॉरच्या मान्यतेसाठी मा.अनंत मांडुकलीकर यांनी व तालमी साठी सर्व कलाकारांनी अथक परिश्रमासह व सर्वस्व पणाला लावले आहे. क्रांतिबा जोतिबा फुले यांनी या देशातील अस्पृश्यांचा मानवतेचा लढा उभा करून आपल्या आयुष्याचे समर्पण अस्पृश्य व बहुजनांच्या साठी दिले त्याच क्रांतिबा फुले यांच्या स्मृती दिनी दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं.७.०० वाजता संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे रणांगण १८१८ या नाटकाचा पहिला शो हृदय स्पर्श सोशल अँड कल्चरल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून सादर होत आहे. या निमित्ताने क्रांतिबा जोतिबा फुले यांना मानवंदना देऊन अभिवादन करू या.. तेव्हा परिवर्तनवादी चळवळीतील तमाम बंधू भगिनींना नाटक पाहण्यासाठी कळकळीचे आवाहन केले आहे. नाटक पहाण्यासाठी केवळ नव्हे तर चळवळ या माध्यमातून पुढे नेऊ पहाणारे कलाकारांचा विश्वास वाढविण्यासाठी लेखक, दिग्दर्शक अनंत कांबळे मांडुकलीकर, संभाजी कांबळे व सर्व कलाकार यांनी आव्हाहन केले आहे.