DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे :- धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग- व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) यांचे मार्फत प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, धुळे येथे गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत रोजगार मेळावा (प्लेसमेंटचे)
आयोजित केला आहे. यासाठी डाटामेट्रींक लिमिटेड, नाशिक, एक्ससाईड इंडस्ट्रिज – लिमिटेड, अहमदनगर, भारतीय आयुविमा कंपनी धुळे, रिलायन्स निप्पाण लाईफ विमा कंपनी, धुळे या कंपनीतील विविध पदासाठी ६०० रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरीसाठी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार व जागेवरच निवड करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील नोकरीसाठी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी विमागाच्या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी • साधक (जॉब सिकर) लॉगिन मधून आपल्या • युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून धुळे जिल्हा निवडून त्यातील प्लेसमेंट ड्रॉईव्ह- ११ पर्याय (२०२३-२०२४) धुळे यांची निवड करावी. उद्योजक, नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महास्वयम पोर्टलच्या विविध लामार्थी घटक जसे उमेदवार, उद्योजक, नियोक्ते इत्यादीने या संकेतस्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे अद्ययावती करणे, रिक्तपदे अधिसूचित करणे, रिक्तपदास अनुसरुन अप्लाय करणे, तसेच युवक व विद्यार्थी यांना करिअरविषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहनपर कार्यक्रम यामध्ये इच्छुकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इत्यादी विविध ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करण्यात देण्यात आल्या आहेत.