DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे – धाडरी गावात छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ व विवेक फौंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबीर व गावातील सर्वसामान्य नागरीकांसाठी व विदयार्थी व विदयार्थीनीसाठी सायबर तज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांच्या सायबर सुरक्षिततेविषयी व्याख्यान झाले.
यावेळेस ॲड. चैतन्य भंडारी यांनी गावातील शेतकरी बांधवांना बँके संदर्भात मोलाचा सल्ला दिला व गावातील महिला वर्गासाठी स्वत:ची ऑनलाईन सुरक्षा कशा प्रकारे यासंदर्भात विविध टिप्स दिल्या व यावेळेस ॲड. चैतन्य भंडारी यांनी सांगितले की, अशा प्रकारची सायबर सुरक्षा मोहिम ग्रामीण भागात राबवावी की जेणेकरून सर्वसामान्य नागरीकांत त्याच्या विषयी जागरुकता वाढेल व सायबर गुन्हेगार त्यांच्या गैरफायदा घेणार नाही. सदरील कार्यक्रम हा गावातील श्री. रामलाल जैन, विक्की अहिरे, सचिन पाटील, अविनाश पाटील, दिपक गोपाल, राहुल बच्छाव यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. तसेच सदर कार्यक्रमात ॲड. सुरेशजी बच्छाव, प्रविण परदेशी व गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.