DPT NEWS NETWORK 🗞️✍️
पालघर:- महाराष्ट्रात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून नेहमी कारवाया होतात त्या कारवाईच्या बातम्या नेहमी वृत्तपत्रातून झळकत असे असतात असे असताना देखील पालघर राज्य उत्पादन शुल्क लाच घेण्यात मागे राहिले नाही.
पालघर येथील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे बिअर शॉप चे लायसन्स मिळण्याकरीता जानेवारी 2023 मध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, पालघर, येथे अर्ज दिला होता.
राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, पालघर, येथील दुय्यम निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले आरोपी लोकसेवक नितीन संख्ये यांनी तक्रारदाराने दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना बियर शॉप चे लायसन्स देण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे 4,00,000/- रू.च्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर 3,40,000/-रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. म्हणून पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई दयानंद गावडे, पोलीस उपअधीक्षक (पालघर), शिरीष चौधरी पोलीस निरीक्षक, पोह. अमित चव्हाण, पोह. संजय सुतार, पोह. दीपक सुमाडा, पोह. विलास भोये, पोह. नितीन पागधरे, पोह. योगेश धारणे, मपोह. निशिगंधा मांजरेकर, मपोना. स्वाती तारवी आणि पोशिचा. जितेंद्र गवळे यांच्या पथकाने केली.
सदर कारवाईसाठी सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिक्षेत्र, अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, सुधाकर सुराडकर, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.