(क्रिडा महोत्सव प्रसंगी)
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
पंडित नेहरू हायस्कूल व माऊंट एव्हरेस्ट उच्च प्राथमिक शाळा, जगदीश नगर, मकरधोकडा, काटोल रोड, नागपूर येथे शिक्षण महर्षी स्व. हरीरामजी बेहरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन श्री पंचमुर्ती शिक्षण संस्थेचे सचिव श्रीरामजी बेहरे यांच्या हस्ते व सहसचिव जयरामजी बेहरे, पंडित नेहरू हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश भोयर, माऊंट एव्हरेस्ट उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना घारपुरे, प्रसिद्ध व्यावसायिक सचिन मिश्रा, कँप्टन केकरे, पर्यवेक्षक राजेश भागवतकर व सकाळ विभागाचे पर्यवेक्षक बाळा आगलावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. हा क्रिडा महोत्सव दिनांक ०८/०१/२०२४ ते ११/०१/२०२४ असा होणार असुन दिनांक ११/०१/२०२४ ला बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळाच्या संधी मिळाव्यात व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी शिक्षण महर्षी स्व. हरीरामजी बेहरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात येते. या उद्घाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश भोयर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की शारीरिक आरोग्या सोबतच बौध्दिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे या करीता विद्यार्थ्यांनी रोजच्या जीवनात खेळ, व्यायाम व योगासने केल्याने आपल्यात उर्जा निर्माण होते व आवडत्या क्षेत्रात यश साध्य करता येते. खेळामुळे हृदय निरोगी, शरीर लवचिक, तंदुरुस्त राहते व तंदुरुस्त शरीरात निरोगी मेंदू राहतो शिवाय वजन नियंत्रणात राहते सोबतच खेळ अर्थजनाचे साधन बणु शकते यात किंचित शंका नाही म्हणून खेळाचे व्यायामाचे जिवनात नियोजन करणे आवश्यक आहे.
विशेषतः क्रीडा महोत्सवाचे प्रायोजक श्री सचिन मिश्रा अ सुन त्यांनी त्यांची स्व. मुलगी संस्कृती मिश्रा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा क्रिडा प्रायोजक केला.
संस्थेचे सचिव श्रीरामजी बेहरे व श्री जयरामजी बेहरे व अतिथी नी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व क्रीडा महोत्सव उद्घाटन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय देशमुख तर आभार प्रदर्शन बाळा आगलावे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दिलीप आडे, विजय घाटुर्ले, राजेश त्रिपाठी, उदय देशमुख, उल्हास पुरकाम, अनिल राऊत, राजेश शिंदे, नितीन तवले, राजकुमार कासलीकर, राहुल शेंन्द्रे, आश्विन ढगे, घेर सर, सौ, संध्या दुधाट, अपर्णा गिरी, आशा अंबादे, जयश्री आगलावे, मिना डफरे, मनिषा तिडके, तारीका बालवानी, संगीता रेवतकर, निर्मला मोडक, लता लाखे, कुंदा कदम, सौ. चंदा ढगे मँडम, पुनम धुर्वे, मोहनकर मँडम, लता खडगी मँडम, सारिका मनीष ढोमणे, अरुण केळवदे, नीता बेहरे व पाटील बाई आदींनी परिश्रम घेतले.