DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने
पाचोरा :- पत्रकार दिनानिमित्त सहा जानेवारीला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यावेळी पाचोरा येथून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, तालुका अध्यक्ष नंदू शेलकर, शहर अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, नगराज पाटील, दिलीप परदेशी, भुवनेश् दुसाने, गजानन गिरी, जावेद शेख, राकेश सुतार, राजेंद्र खैरनार, भिकन पाटील, असे दहा ते पंधरा पत्रकार जळगाव येथून कार्यक्रम करून येत असताना नांद्रा या बस स्टैंड जवळ खानदेश अमृततुल्य या हॉटेलवर चहापाणी घेत असताना जळगाव कडून पाचोरा तालुक्याचे माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ येत असताना त्यांना गाडीतून सर्व पत्रकार दिसले असता त्यांनी गाडी थांबून व खाली उतरून त्यांच्याजवळ चहाचा आस्वाद घेतला व त्यांना सर्वांना पत्रकार दिनाच्या आगळे वेगळे शुभेच्छा देऊन त्यांचा सर्वांचा तेथे सत्कार केला दिलीप भाऊ यांचे पत्रकारांवर असलेले प्रेम पाहून पत्रकारही भारावले दिलीप भाऊ यांनी दाखवलेले प्रेम खरोखर वाखनाण्या जोगे असून दिलीप भाऊ वाघ यांनी पत्रकारांचे अभिनंदन करून चहा पाण्याचे व नाश्त्याचे सर्व बिल त्यांनी दिले याबद्दल पत्रकारांनी त्यांचे मनापासून आभार मानले श्री दिलीप भाऊ वाघ यांचे पत्रकारावरचे खरे प्रेम.