DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- स्थानिक राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील कलाशिक्षक सुरेश राठोड यांची शालेय, सामाजिक व कला क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे तर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार 2024 करिता निवड करण्यात आली.
डहाणू (जि. पालघर) येथील 42 व्या कलाशिक्षण परिषदेमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे अध्यक्ष नरेंद्र बारई, उपाध्यक्ष बलराम सावंत, सरचिटणीस दिगंबर भेंडाळे, राज्य कोषाध्यक्ष विजयसिंह ठाकूर, सहसरचिटणीस प्रकाश पाटील, माजी अध्यक्ष पी. आर. पाटील उपस्थित होते. कलाध्यापक राठोड हे वीस वर्षापासून राष्ट्रीय विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भिवापूर येथे कला शिक्षक या पदावर कार्यरत असून ते उत्तम सुलेखनकार, कवी, लेखक तथा बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांना याआधीही बऱ्याच पुरस्कारानी गौरविल्या गेले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था सचिव लतिफा कुरेशी, संस्था सहसचिव शहाला शेख, प्राचार्य इमरान शेख, पर्यवेक्षक फारुख शेख, गजानन मुरकुटे, अंगद शिवरकर, अजय चांदोरे, अरविंद टिकले, अजहर कुरेशी, सलीम शेख, गणेश बोरकर, प्रमोद नाकाडे, फुला भागवत, वंदना हूकरे ,कीर्ती मेहेरकुरे, प्रणिता घुमे, शुभांगी बालपांडे ,चंदा शेगावकर, शोएब कुरेशी, रेहान सय्यद शेषराव चौधरी , नाना दिघोरे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.