DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय
नांदेड:- लोहा पोलिसांची दमदार कारवाई महाराष्ट्रात बंदी असलेला तंबाखू व गुटखा केला जप्त. दि.28/1/2024 रोजी लोहा पोलिसांनी टाटा एस वाहनांमध्ये 5.25 लाख रुपयाचा बनावट सूर्य छाप जर्दा तंबाखू व गुटखा जप्त केला. यात दोन आरोपींना अटक केली असून लोहा पोलिसात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोहा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नांदेड कडून लोहा कडे बनावट तंबाखू व गुटखा वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे तात्काळ एक टीम तयार करून नांदेड कडे जाणाऱ्या रोडवर टीम रवाना करण्यात आली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टीम थांबून होत्या. तेव्हा नांदेड कडून एक टाटा एस चार चाकी गाडी येत असताना पोलिसांनी तिला अडवून पकडले त्या 35 बॉक्स बनावट सूर्य छाप जर्दा तंबाखू मिळून आला. तर त्याच गाडीमध्ये विमल,ए-1,आदत/ए ए ए नावाचा गुटखा ही मिळून आला.
सदर वाहनातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून जागीच सदर गाडीतील दोन्ही आरोपींना अटक केली. पकडलेल्या टाटा एस गाडीचा क्रमांक mh 04 fp 0910 असा असून या वाहणा बाबत पोलीस पुढील तपास करत आहे.
यातील आरोपी हे नांदेड येथील असून त्यांची नावे शेख समेर शेख आयुनोदीन वय 21 वर्ष, नुरी चौक गोविंद नगर नांदेड, सय्यद अमेर सय्यद महमद अली वय 22 वर्ष खुदबेनगर चौरस्ता, नांदेड अशी आहेत.
पोलीस हवालदार नारायण कदम यांच्या तक्रारीवरून लोहा पोलीस स्टेशन येथे गुरव क्र 27/2024 भादवी कलम 420,328,34 व कोटपा अधिनियम कलम 5,7,8,20,22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि चन्ना साहेब हे करत आहेत.
सदर आरोपीना कस्टडी मध्ये घेऊन लोहा पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपी यांनी सदरचा माल कुठून आणला, सदरचा बनावट माल कोण्या ठिकाणी बनवण्यात आला, सदर माला मागील मुख्य सूत्रधार कोण आहे,सदरचा माल बाहेर राज्यातून बनवून आणला की नांदेडमध्ये बनला याचा पुढील तपास लोहा पोलीस करत आहेत.
सदरची कार्यवाही ही पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चन्ना, पोहेकाॅ नारायण कदम, निवृत्ती मुलमवाड, संजय मेकलवड, नामदेव ईजुळकंठे, वामन राठोड यांनी केली.