DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव
चंदगड :- चंदगड पोलीस स्टेशन अंतर्गत पाटणे फाटा येथील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक शेखर बारामती यांची निवड झाल्यानंतर पाटणे फाटा परिसरातील त्यांच्या कार्यतत्पर व उल्लेखनीय कार्याची दखल घेत चंदगड तालुका छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांची पोलीस चौकी येथे भेट घेतली. शाल व पुष्पगुच्छ देवून श्री बारामती यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी छावा मराठा युवा संघ चंदगड अध्यक्ष किरण नागुर्डेकर,पदाधिकारी पांडुरंग शिंदे, गजानन गावडे, संभाजी पाटील, संदीप सकट, कैलाश बोकडे, तुकाराम गावडे, शाम भोसले, अजय साळुंखे, रोहन नागुर्डेकर, सागर पाटील, सुमित बोकडे, किरण सुतार अजित पाटील व दर्शन पोलीस टाईम तालुका प्रतिनिधी प्रा नागेंद्र जाधव उपस्थित होते. यावेळी श्री बारामती यांनी सर्व पदाधिकारी यांना विधायक, समाजउपयोगी व राष्ट्रीय एकात्मतेला बाधा न येता प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य करण्याच्या सूचना दिल्या.