DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- प्रा नागेंद्र जाधव/संदिप सकट
चंदगड: अखिल भारतीय छावा मराठा युवा महासंघ थेरगाव पुणे येथील संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर – पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदमापूर (बाळूमामा) येथे पार पडलेल्या बैठकीत अखिल भारतीय छावा संघटनेच्या चंदगड तालुका प्रमुखपदी जंगमहट्टी ता चंदगड येथील किरण पुंडलिक नागुर्डेकर, उपाध्यक्षपदी अजय विठ्ठल पाटील(सरोळी), कार्याध्यक्षपदी पुंडलिक मारूती आपके यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर , प्रदेश उपाध्यक्ष संजय जाधव, प.महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब पाटील,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष साताप्पा भोसले, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष सचिन अल्लट आदी पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंदगड मधील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते गजानन गावडे, संभाजी पाटील (जंगमहट्टी) , कैलाश बोकडे (मजरे कार्वे) तसेच चंदगड तालुक्यातील छावा मराठा युवा महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.