DPT NEWS NETWORK🗞️✍️
प्रतिनिधी -: अनिल डाके/ नारायण कांबळे
कोल्हापूर :- इचलकरंजी येथील पाच हजारांची लाच स्वीकारताना तलाठी अमोल जाधव याला लाचलूचपूत विभागाच्या अधिकारी यांनी रंगेहात पकडण्यात आले.
इचलकरंजी शहरातील रिसनं.४५२ क्षेत्र ००.९० आर इतकी मिळकतीचे २०१९ सालीचे रजिस्टर बक्षीस पत्र मिळकत सात बारा पत्रची नोंद करणेसाठी तक्रारदार यांच्याकडे ५००० हजार रुपये रक्कम मागणी केली होती. तडजोडी अंती ४००० हजार रुपये लाच स्विकारताना तलाठी अमोल आनंदा जाधव याला पकडण्यात आले.
तलाठी अमोल जाधव यांच्यावर इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सरदार नाळे, सापळा पथकाच्या निरीक्षक आंसमा मुल्ला, सहायक पोलिस प्रकाश भंडारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलिस नाईक सुधिर पाटील, पोलिस कॉन्स्टेबल सचिन पाटील,चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप पोवार, विष्णू गुरव, सुरज अपराध. यांनी कामगिरी बजावली.