DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री: धुळे जिल्ह्यातील साक्री शहरापासून अवघ्या काही किलोमिटर अंतरावर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ नागपूर -सुरत नवीन बायपास चे काम पुर्ण होवून दुहेरी मार्ग सुरु करण्यात आला आहे.
नवीन बायपास मार्गे वाहतूक सुरू होताच अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. शेवाळी गावाजवळील हॉटेल कृष्णा गार्डन जवळ साक्री शहरातुन येणारे वाहने व नंदुरबार शहराकडून येणारे वाहने हे नविन बायपास मार्गे क्रॉसिंग करतांना वारंवार वाहनधारकांचा गोंधळ निर्माण होवून अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या ठिकाणी काही दिवसापूर्वी वाहनांच्या वेगेची मर्यादा कमी करण्यासाठी नविन बायपास वरती तात्पुरत्या स्वरूपात गतिरोधक बसविण्यात आले होते परंतु गती रोधक लहान असल्याने ते जास्त दिवस नाही टिकले परिणामी पहिल्या सारखे वाहने वेगात जावू लागले यामुळे अपघाताचे प्रमाण ही वाढू लागले आहे अशा वेळी वारंवार होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन तात्काळ त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचे गतिरोधक बसवावे अशी मागणी वाहनधारक व सामान्य नागरिक करीत आहेत.